हवालदाराच्या सतर्कतेने मध्यप्रदेशातील आरोपी जाळ्यात
भुसावळ : शहरातील आठवडे बाजारात भाजी खरेदी करीत असलेल्या ग्राहकाचा मोबाईल लांबवणार्या भामट्यास बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हवालदाराने झटापट पकडून अटक केली. तक्रारदार विलास मनोहरराव बोरगावकर (45, नंदनवन कॉलनी, भुसावळ) हे आठवडे बाजारात भाजी खरेदी करीत असताना संशयीत आरोपी रवी जसवंत सिसोदिया (25, शिव कॉलनी, पाण्याच्या टाकीजवळ, इंदोर रोड, बर्हाणपूर) याने अल्पवयीन मुलाची मदत घेत 21 हजार रुपये किंमतीचा मोबाईला लांबवला.
या भागात असलेल्या बाजारपेठचे हवालदार मोहम्मद अली सत्तार अली सैय्यद यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोपीच्या मुसक्या आवळत बाजारपेठ पोलीस ठाण्यात आणले. यावेळी आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र तो निष्फळ ठरल ता मो.वली सैय्यद यांच्या हातालादेखील खरचटले.