भुसावळात भावानेच केला भावाचा निर्घूण खून

0

वैयक्तिक वाद टोकाला ; गळ्यावर केले चाकूचे वार

भुसावळ- शहरातील गंगाराम प्लॉट भागात सख्या भावानेच वैयक्तिक वादातून आपल्या भावाच्या गळ्यावर चाकूचे वार करून त्याचा खून केल्याची घटना शनिवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत व्यवसायाने चालक असलेल्या योगेश प्रल्हाद पाटील (32) यांचा मृत्यू झाला असून त्यांचा भाऊ व संशयीत आरोपी स्वप्नील प्रल्हाद पाटील (28) यास अटक करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, पोलिस निरीक्षक देविदास पवार व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.