भुसावळात भीक मागण्याचा बहाण्याने 35 हजार लांबवले

0

भुसावळ: भीक मागण्याच्या बहाण्याने चार ते पाच महिलांनी टायर्सच्या दुकानात शिरत ड्रॉवरमधून 35 हजार रुपये लांबवल्याची घटना गुरुवारी घडली. जळगाव रोडवर मनजीतसिंग थेट्टी यांचे हरप्रीत टायर्स नामक दुकान आहे. चार ते पाच महिलांनी भीक मागण्याचा बहाणा करीत दुकानात प्रवेश केला. एक महिला भीक मागत असताना अन्य महिलांनी ड्रावरमधील 35 हजारांची रोकड लांबवली. विशेष म्हणजे याबाबतचा व्हिडिओ सोशल मिडीयावर शुक्रवारी वायरलदेखील झाला. शहर पोलिसात मात्र याबाबत गुन्हा दाखल नसल्याचे सूत्रांनी सांगितले.