भुसावळात मंदिराच्या दानपेटीसह किराणा दुकान फोडले

व्यापारी धास्तावले : दोन ठिकाणी अयशस्वी प्रयत्न

भुसावळ : शहरातील जवाहर डेअरी समोरील मारोतीच्या मंदीरातील दानपेटी चोरट्यांनी फोडून त्यातील सुमारे आठशे ते हजाराची चिल्लर लांबवली तर त्याच्याच जवळ असलेल्या अशोक आहुजा यांच्या किराणा दुकानात सुध्दा चोरट्यांनी चोरी करून दुकानातील किराण्यासह रोख रक्कम मिळून सुमारे आठ ते 10 हजाराचा सामान लांबवला.

मंदिरासह किराणा दुकाने टार्गेट
जवाहर डेअरी समोर असलेल्या मारोती मंदीरात असलेली दानपेटी चोट्यांनी फोडत पेटीत असलेले 800 ते एक हजार रुपयांची रोकड लांबवण्यात आली तसेच मंदीराजवळील अशोक आहुजा यांच्या किराणा दुकानाती रोख 600 रुपयांची रक्कम व अन्य किराणा साहित्य मिळून सुमारे दहा हजारांचा माल लांबवला. त्यानंतर मार्केटमधील कन्हैयालाल तलरेजा यांच्या दुकानाच कुलूप तोडण्याचा प्रयत्न झाला मात्र कुलूपे तुटली नाही तसेच गंगाराम प्लॉट भागातील शिव ट्रेडर्स या दुकानातही चोरीचा प्रयत्न फसला तसेच अजून एका दुकानात चोरी झाली.