भुसावळात मद्यपी ट्रक चालकास अटक

0

भुसावळ- मद्य पिवून ट्रक चालवणार्‍या चालकासह शहर पोलिसांनी अटक केली. गुलाबप्रसाद यादव (55, रा.आर्जद, गुजराथ) असे संशयीत आरोपीचे नाव आहे. सोमवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास आरोपी चालक ट्रक (जी.जे.23-7350) घेवून यावल रोडने जात असताना शहर पोलिसांना संशय आल्याने त्यांनी वाहन थांबवले. आरोपी चालक हा मद्याच्या नशेत वाहत चालवत असल्याचे आढळल्यानंतर वाहन शहर पोलिसात आणण्यात आले व ट्रक चालकाची ब्रिथ अ‍ॅनलायझर यंत्राद्वारे तपासणी केली असता त्याने मद्य प्राशन केल्याचे सिद्ध झाल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश वणीकर, सलीम तडवी, संदीप राजपूत यांनी केली.