भुसावळ- रेल्वे उड्डाणपुलावर भल्या पहाटे दोन ट्रक समोरा-समोर धडकल्याने वाहतूक ठप्प झाली तर सुदैवाने प्राणहानी टळली. जळगावकडून कलकत्त्याकडे प्लॅस्टीकचे दाणे घेऊन जात असलेला ट्रक (जी.जे.05 बी.एक्स.5862) हा जात असताना भुसावळकडून जळगावकडे लोखंडी पाईप घेवून जाणारा ट्रक (जी.जे.06 ए.व्ही. 3527) मध्ये समोरा-समोर धडक झाली. शुक्रवारी पहाटे पावणेसहा वाजता हा अपघात झाला. सुदैवाने प्राणहानी टळली असलीतरी वाहतूक मात्र ठप्प झाली. शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक दीपक गंधाले व सहकार्यांनी क्रेन मागवला तर दोन तासांच्या प्रयत्नानंतर अपघातग्रस्त हटवल्याने दुपारी 12 वाजतामहामार्ग मोकळा झाला. या प्रकरणी पोलिसात नोंद नसल्याचे सूत्रांनी सांगितले.