भुसावळात महाराणा प्रताप जयंतीचा उत्साह

0

भुसावळ- शहरात महाराणा प्रताप जयंती शनिवारी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाराणा प्रताप चौकातील महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर व समाधान महाजन यांनी पुष्पहार अर्पण केला. किशोर चौधरी, छायाचित्रकार श्याम गोविंदा, सुरेंद्रसिंग पाटील, प्रशांतसिंग ठाकूर, प्रा.समाधान पाटील, चंदू बोरसे, प्रा.भास्कर पाटील, पवन पाटील, किरण पाटील, विलास पाटील, डी.एल.पाटील, सुभाष पाटील, ललित पाटील, गोकूळ पाटील, राजस्थानसिंग शेखावत, नरेश चौधरी, सोनूसिंग पाटील, महेंद्र पाटील, बी.बी.सोनार, पवन चौधरी, नितीन पाटील, जेठाराम टाक, मनोज चौधरी, गोपीसिंग राजपूत, संदीप राणा, पप्पू पाटील, मोहनसिंग पाटील, कैलाश भोळे, किशोरसिंग ठाकूर, शुभम राजपूत, सुनिल सिंग पाटील, बबलू राजपूत, किशोर राणे,विजय सुरवाडे, निलेश सुरडकर, तुषार हवाईकर, अमर सोनार, सचिन महाजन, अ‍ॅड. हरीश पाटील, सतीश महाजन, गणपत चौधरी, प्रवीणपाटील, नन्दू पाटील यांच्या सह समाजबांधव उपस्थित होते.

स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन शिबिर
महाराणा प्रताप जयंतीनिमित्त स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन शिबिर तसेच मोफत क्लासेसचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना लाभ घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी सोनुसिंग पाटील व चंद्रसिंग बोरसे यांच्याशी संपर्क साधवा. विद्यार्थ्यांना प्रा.समाधान पाटील व बी.एन.पाटील हे शिक्षक मार्गदर्शन करणार आहे.