भुसावळात महिलांसाठी स्वच्छतागृहांची वाणवा

0

पालिकेने उपाययोजना न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन

भुसावळ :- नाशिक विभागात एकमेव ‘अ’ वर्ग पालिका असलेल्या शहरात महिलांसाठी एकही प्रसाधनगृह नसल्याने महिलावर्गाची मोठी कुचंबना होत आहे. कोट्यवधी रुपयांच्या योजना मंजूर झाल्याचा दिखावा करून शहराचा विकास होत असल्याचे भासवले जात असले तरी संपूर्ण शहरात माता-भगिनींसाठी स्वतंत्र असे प्रसाधनगृह नसल्याने महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पुरुषांसाठी जे स्वच्छतागृह आहे त्यांची अवस्था अत्यंत बिकट व अस्वच्छ अशी आहे. पालिका प्रशासनाने या बाबींची गांभिर्याने दखल घ्यावी व महिलांसाठी सुसज्ज प्रसाधनगृह उभारावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीतर्फे पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना करण्यात आली आहे. निवेदनाची दखल न घेतल्यास मनसे स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशारा महिला आघाडीच्या मयुरी मनोज पाटील, चारुलता पाटील, गीता सुरडकर, दशरथ सपकाळे, विलास कोळी आदींनी दिला आहे.