भुसावळात मानव अधिकार कायद्याविषयी मार्गदर्शन शिबिर

0

तालुका विधी सेवा समितीचा उपक्रम

भुसावळ- तालुका विधी सेवा समितीतर्फे मानव अधिकार कायदा 1993 व दुरुस्ती 2006 विषयी मार्गदर्शन शिबिराचे मंगळवारी आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश- वर्ग- 1 एस.पी.डोरले होते. जिल्हा न्यायाधीश-2 पी.आर.सित्रे, दिवाणी न्यायाधीश व.स्तर आर.आर.भागवत, सह दिवाणी न्यायाधीश व.स्तर पी.ए.साबळे, सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर एस.एन.फड, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर डी.एम.शिंदे, चौथे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर एस.एल.वैद्य, पाचवे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर एस.व्ही.सुळ, सहावे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर पी.व्ही.चिद्रे हे सर्व उपस्थित होते.

यांची होती उपस्थिती
सूत्रसंचालन अ‍ॅड.विक्रम शेळके यांनी केले. शिबिरात एस.एन.फड यांनी तसेच अ‍ॅड.एस.पी.अढाईंगे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला तालुका वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.अशोक शिरसाठ, माजी अध्यक्ष अ‍ॅड.एम.एस.सपकाळे उपस्थित होते. आभार अ‍ॅड.जया झोरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी कनिष्ठ लिपीक किशोर पिंगाणे व वरीष्ठ लिपिक पी.एम.काळे यांनी परीश्रम घेतले.