भुसावळात मुस्लिम समाजबांधवांची निदर्शने

0
खाजगी वाहिनीवरील मालिकेला विरोध ; प्रशासनाला निवेदन
भुसावळ: – खाजगी वाहिनी झी टिव्हीवरील ‘इश्क सुब्हनअल्लाह’ मालिकेमुळे मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या जात असून ही मालिका तातडीने बंद करावी, अशी मागणी शहरातील मुस्लिम बांधवांनी बुधवारी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. धार्मिक भावनांना उत्तेजन देण्याची इच्छा या मालिकेच्या शिर्षकाने दर्शवल्याचे निवेदनात नमूद आहे.
यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या
साबीर मेंबर, मौलाना अ.हकिम साहब, हफिज गुलाम सरवर, हफिज सुलतान, इरफान रजा, हाफिज कमरोद्दीन, अबरार शेख, शेख रफिक शेख मजिद, मुजाहिद बतावत, अंजुम परवेज, अब्दुल सईद अत्तारी, फिरोज शेख, मो.मुनव्वर खान, मेहबूबखान रशिदखान, अ.रशिद शे.हनिफ, शकील अहेमद बागवान, अशिकखान शेरखान, नेहाल अहेमद अ.हमीद, सरदार उस्मान पिंजारी, शेख फरहान शेख बशीर, हाजी शे.सलीम पिंजारी, हाफिज कमरुद्दीन, मौलाना रईस शाह, मौलाना आशिक, अ‍ॅड.ऐहतेशाम मलीक यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या आहेत.