भुसावळ- जीआरपी बॅरेकजवळील जुन्या मोटारसायकल स्टॅण्डजवळून रेल्वेत मेल गार्ड असलेल्या कर्मचार्याची दुचाकी लांबवण्याची घटना 7 रोजी घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. मेल गार्ड मुनेशकुमार रामबीर सिंग (40, एजीसी स्कूलसमोर, भुसावळ) यांनी जुन्या मोटारसायकल स्टॅण्डजवळ दुचाकी (यु.पी.81 पी.0590) लावून ते 7 रोजी ड्युटीसाठी निघून गेले. 8 रोजी भुसावळात परत आल्यानंतर त्यांना जागेवर दुचाकी न आढळल्याने चोरी झाल्याची खाली झाली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल असून तपास हवालदार माणिक सपकाळे करीत आहेत.