भुसावळ- शहरातील आठवडे बाजारातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 20 जणांचे मोबाईल लांबविल्याच्या वेगवेगळ्या घटना 21 रोजी सकाळी 11 ते 12.30 वाजे दरम्यान घडल्या होत्या तर पोलिसांनी या प्रकरणी झारखंड राज्यातील राहुल बहादुर नेमीया (21) व अन्य एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलास ताब्यात घेेतले होते. संशयीतांच्या अंगझडतीत तक्रारदार प्रदीप पाटील यांचा मोबाईल आढळला होता. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात रविवारी रात्री सहा जणांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला तर आरोपी नेमीया यास न्यायालयात हजर केले असता त्यास एका दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, झारखंड राज्यातील या टोळीचे मोठ्या प्रमाणावर सदस्य जिल्ह्यात दाखल झाले असून लोहमार्ग पोलिसांनी अटक केलेल्या चौघा आरोपींशी त्यांचा संबंध असल्याची शक्यता आहे तसेच चोरी केलेले मोबाईल अन्य सदस्याने लांबवल्याची शक्यता तपासाधिकारी हवालदार मिलिंद कंख यांनी वर्तवली.