भुसावळात युवकावर चाकूहल्ला

0

भुसावळ- पोलिस रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगार बाबा काल्यान याने अरबाज शकील आझाद (22, रा. जुनी बीझेड उर्दू हायस्कूल, भुसावळ) याच्यावर चाकू हल्ला केल्याची घटना गुरूवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. शहरातील खडका रोडवरील लाल बिल्डींगजवळ ही घटना घडली. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाला. दरम्यान, जखमी आझादवर जळगाव येथे उपचार सुरू आहे. खडका रोडवरील लाल बिल्डींग जवळ दुपारी 12 च्या सुमारास गुन्हेगार बाबा काल्या याने अरबाज आझाद यांच्यावर चाकूने तीन वार केले. जखमीला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. हल्ल्याचे नेमके कारण कळू शकले नाही. घटनेनंतर पोलिस निरीक्षक देविदास पवार आणि पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठले मात्र संशयीत बाबा काल्या पसार झाला.