भुसावळात रविवारी सामूहिक विवाह सोहळा

0

भुसावळ- मुस्लीम मणियार एज्युकेशन अ‍ॅण्ड वेलफेअर सोसायटीच्यावतीने समाजातील गरजूंसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन रविवार, 25 रोजी सकाळी 11 वाजता खडका रोडवरील नगरपालिका शाळा क्रमांक 28 मध्ये आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात चार वधू-वरांचा विवाह लावण्यात येणार आहे. कार्यक्रमास मोहम्मद इद्रीस, शेख यासीन, शेख अय्युब, शकील भाई आदींची उपस्थिती राहणार आहे.