भुसावळ : राज्याचे अपर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंह हे मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता भुसावळात दाखल झाले. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी त्यांनी स्वागत केले. राजेंद्र सिंह यांनी सकाळपासून दुपारी उशिरापर्यंत बाजारपेठ पोलीस ठाण्यातील दप्तरांची तपासणी करून गुन्ह्यांबाबत आढावा घेतला.
याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल तसेच बाजारपेठ निरीक्षक चंद्रकांत सरोदे, तातलुक्याचे निरीक्षक सूर्यकांत पाटील, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले यांच्यासह भुसावळ विभागातील अधिकारी उपस्थित होते.