इंधन दरवाढीचा निषेध : प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन
भुसावळ- वाढती महागाई आणि इंधनाचे दर कमी व्हावेत या मागणीसाठी राष्ट्रीय मजदूर सेनेतर्फे सोमवारी दुपारी 12 वाजता म्युनिसीपल हायस्कूलपासून प्रांताधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. वाढत्या इंधन दरवाढीचा मोर्चेकर्यांनी प्रसंगी निषेध केला. राष्ट्रीय मजदूर सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू डोंगरदिवे यांनी मोर्चाचे नेतृत्त्व करतील. केसरी कार्ड धारकांना धान्य द्यावे अत्याचार प्रकरणातील दोषींवर कारवाई आदी मागण्यांबाबत प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. सुभाष सपकाळे, आकाश विरघट, राजू चौथामल, कल्पना तायडे, सोनू विरघट, रंजना शिरतुरे, जमीला गवळी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.