भुसावळ – मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळातर्फे शुक्रवारी शहरातील श्रीकृष्णचंद्र सभागृहात झालेल्या रेल्वे पेन्शन अदालतीत 165 तक्रारींचा निपटारा मुख्य न्यायाधीश तथा डीआरएम आर.के.यादव यांनी केला. याप्रसंगी 28 लाख पाच हजार 549 रुपये अदा करण्यात आले. याप्रसंगी अपर मंडळ रेल प्रबंधक मनोज सिन्हा, वरीष्ठ मंडळ वित्त प्रबंधक विजय कदम, वरीष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे उपस्थित होते. सुत्रसंचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी (कल्याण) आर.एच.परदेशी यांनी केले. पेन्शनर्स असोसिएशनचे एन.आर.सरोदे यांनी सेवानिवृत्तांच्या समस्या मांडल्या. याप्रसंगी सहाय्यक कार्मिक अधिकारी आर.एन.गेडाम, विरेंद्र वडनेरे, सहाय्यक मंडळ वित्त प्रबंधक आर.जे.तळेले उपस्थित होते.