भुसावळात रेल्वे कर्मचार्‍यावर गोळीबार !

0

आत्महत्येचा प्रयत्न की वैमनस्यातून घटना ? संभ्रम कायम ; शस्त्रक्रियेअंती घटना झाली उघड

भुसावळ- शहरात रेल्वे कर्मचार्‍यावर गोळीबार झाल्याची घटना मंगळवारी रात्री उघड झाली असून या कर्मचार्‍याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला की वैमनस्यातून त्याच्यावर गोळीबार झाला याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. याकूब जॉर्ज (36) असे जखमी कर्मचार्‍याचे नाव आहे.

शस्त्रक्रियेनंतर बाब उघड
रेल्वेच्या दहा बंगला भागातील रहिवासी तथा रेल्वेत कर्मचारी असलेले याकूब जॉर्ज हे सोमवारी रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याने त्यांना मंगळवारी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हलवल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली तर प्रसंगी त्यांच्यात डोक्यात पिस्तूलची गोळी निघाल्याने वैद्यकीय सूत्रांनी पोलिसांना माहिती दिली. शहर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी डीवायएसपी गजानन राठोड यांनी माहिती कळताच शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व कर्मचार्‍यांनी मंगळवारी रात्री 10.45 वाजता जॉर्ज यांच्या निवासस्थानी धडकले. पोलिसांना घर झडतीत गोळीची रीकामी पुंगळी सापडली आहे.

घटनेचे कारण नेमके गुलदस्त्यात !
दरम्यान, जखमी जॉर्ज हे त्यांच्या पत्नीपासून गेल्या चार वर्षापासून विभक्त राहत असून पत्नी पुण्यात वास्तव्यास आहे. गोळीबारानंतर घरात जॉर्ज हे एकटेच घरात पडून होते
त्यामुळे त्यांनी नैराश्यातून स्वतःवर गोळीबार केला की अन्य कुणी त्यांच्यावर गोळी चालवली? या बाबी पोलिस तपासात व जॉर्ज यांच्या जवाबानंतर निष्पन्न होणार आहेत.