भुसावळात रेल्वे कर्मचार्‍याचा खून करणारा विनोद चावरीया जाळ्यात

0

भुसावळ- रेल्वेच्या दहा बंगला भागातील रेल्वे कर्मचार्‍यावर गोळीबार करून त्याचा खून करणार्‍या तसेच दरोड्याच्या उद्देशाने शहरात दाखल झालेल्या कुविख्यात विनोद चावरीया यास शहर पोलिसांनी अटक केली आहे. संशयीत चावरीया याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची म्हणजे 26 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. रेल्वेच्या दहा बंगला भागातील रहिवासी याकूब डॅनियल जॉर्ज यांचा 8 एप्रिलला गोळीबार करून खून झाला होता तर मयताचा चुलत शालक बॉबीसिंग याला अटक करण्यात आली होती मात्र मुख्य संशयीत विनोद चावरिया (रा.कवाडे नगर, भुसावळ) हा पसार होता. सोमवारी संशयीत कवाडे नगरात आल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मो.वली सैय्यद व संजय पाटील तपास करीत आहेत.