भुसावळ- रेल्वेची केबल वायर चोरी प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील पसार असलेल्या संशयीत आरोपीस बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. चैम्पियन श्याम पारधी (22, इंगळे, रा. भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध रेल्वे सुरक्षा बलात गुन्हा दाखल होता तर आरोपी जुन्या तालुका पोलीस ठाण्याजवळील झोपडपट्टीत आल्याची माहिती कळताच बाजारपेठचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय आनंदसिंग पाटील, नाईक रवींद्र बिर्हाडे, कॉन्स्टेबल विकास सातदिवे आदींनी आरोपीस ताब्यात घेत रेल्वे सुरक्षा बलाच्या ताब्यात दिले.