भुसावळ : कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी शहरातील केंद्रावर नागरीकांची गर्दी उसळली असताना शनिवारी लस संपल्याने मोठा गोंधळ उडाल्याचे चित्रव् होते. शहरात आता पूर्णपणे लसीकरण थांबले असून शासनाकडून लस आल्यानंतरच लसीकरणाची प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी शहरातील महात्मा फुले आरोग्य केद्रात मात्र लसीकरणासाठी नागरीक आले मात्र लयस संपताच कळताच गोंधळ उडाला. शुक्रवारी विविध केद्रावर 660 जणांना लसीकरण करण्यात आले.
लस आल्यानंतरच पुढील लसीकरण
भुसावळ आरोग्य विभागाकडे असलेला लसीकरणाचा साठा संपल्याने शुक्रवारी दुपारी लसीकरण केद्रांवर आलेल्या नागरीकांना लसीविनाच घरी जावे लागले. सकाळपासून लसीकरण केद्रावर नागरीकांची गर्दी होती. केद्रांवर जितक्या लस उपलब्ध होत्या. तितक्या लस आलेल्या नागरीकांना देण्यात आल्यात. मात्र लस संपल्यावर ज्या केद्रांवर लसीकरण सुरू होते, त्या केद्रांवर नागरिकांनी गर्दी केली होती, शहरातील महात्मा फुले आरोग्य केद्रावर लस सपल्याची माहिती मिळाल्यावर रांगेत थांबलेल्या नागरीकांनी गोंधळ घातला, मात्र डॉ.आतिया खान यांनी लस उपलब्ध झाल्यावर आपणा सर्वांना लसीकरण केले जाइॅल असे सांगत, कुणीही गोंधळ घालू नका, लसीकरण आपल्याच साठी असल्याचे सांगत उपस्थितांना शांततेचे आवाहन केले.