सलग चौथ्या दिवशी दहा दुकानदारांकडून 25 हजारांचा दंड वसुल : एका दुकानाला पथकाने ठोकले सील
भुसावळ : कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी 7 ते 13 दरम्यान भुसावळात कडकडीत लॉकडाऊन जाहीर केला असलातरी काही दुकानदारांकडून नियमांचे उल्लंघण करून दुकाने उघडली जात असल्याने अशा दुकानदारांविरुद्ध पालिकेच्या पथकाकडून गेल्या चार दिवसांपासून धडक कारवाई केली जात आहे. शुक्रवारीदेखील दुकाने उघडून व्यवसाय करणार्या व्यावसाीयकांसह भाजी विक्रेते मिळून दहा व्यावसायीकांवर पालिका पथकाने कारवाई करीत 25 हजारांचा दंड वसुल केला तर एका दुकानाला सील ठोकण्यात आले. या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे.
या दुकानांवर केली दंडात्मक कारवाई
प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या पथकाने शहरातील दिलीप पटवारी (वेफर्स कारखाना, चाहेल ढाब्यासामोर), शेख रीजवाण टायरवाले (खडका चौफुली जवळ), खान्देश फेब्रिकेशन (खडका चौफुली जवळ), मानिरुल इस्लाम लष्कर गॅरेजवाले (वरणगाव रोड), अविनाश महेंद्र गोठले (भाजी विक्रेता, म्युन्सीपल पार्क), सागर ठाकरे (भाजी विक्रेता, मुन्सीपल पार्क), प्रफुल घाडगे (भाजी विक्रेता, मुन्सीपलइ पार्क), बब्बू गवळी (किराणा दुकान, गवळी वाडा), भारत रेडियटर (जळगाव रोड), विश्वकर्मा फेब्रिकेशन (जुना सातारा, जळगाव रोड) यांच्यावर दंडात्मक कारवाई केली तसेच भारत ट्रेडर्स (पूजा कॉम्प्लेक्स) हे दुकान सील करण्यात आले. सार्वजनिक थुंकण्यास मनाई असतानाही नियमांचे उल्लंघण केल्याने प्रशांत अशोक साळी (अमळनेर) यांना दंड करण्यात आला.
यांनी केली कारवाई
भुसावळ पालिकेचे लेखापाल संजय बाणाईते, अभियंता पंकज पन्हाळे, सुरज नारखेडे, चेतन पाटील, रामदास म्हस्के, विशाल पाटील, किरण मनवाडे, अनिल मनवाडे, राजेश पाटील, स्वप्नील भोळे, गोपाल पाली, विजय राजपूत, योगेश वाणी, धनराज बाविस्कर, मयूर भोई, दीपक शिंदे, कॉन्स्टेबल चारुदत्त पाटील, कॉन्स्टेबल किशोर पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.