दावा दाखलपूर्व 72 तर प्रलंबित 45 प्रकरणे निकाली
भुसावळ- तालुका विधी सेवा प्राधिकरणातर्फे शनिवारी शहरातील अतिरीक्त सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. न्यायालयातील प्रलंबित 555 प्रकरणांपैकी 45 प्रकरणे निकाली निघून एक कोटी सात लाख 31 हजार 160 रुपयांची तडजोड करण्यात आली तर दावा दाखलपूर्वच्या तीन हजार 245 प्रकरणांपैकी 72 प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यात 13 लाख 22 हजार 606 रुपयांची तडजोड करण्यात आली. विशेष म्हणजे या लोकन्यायालयात श्रीराम सिटी फायनान्सकडील एका प्रकरणात एकरकमी 47 लाख रुपये एकरकमी भरून तडजोड करण्यात आली.
यांनी पाहिले पॅनलप्रमुख म्हणून काम
पॅनल क्रमांक एकवर जिल्हा व सत्र न्या.एस.पी.डोरले, पॅनल दोनवर दिवाणी न्या.आर.आर.भागवत, पॅनल तीनवर दुसरे सह दिवाणी न्या.एस.डी.गरड, पॅनल चारवर सहावे दिवाणी न्या.पी.व्ही.चिद्रे यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. पंच म्हणून अॅड.विजय तायडे, अॅड.मोना खान, अॅड.जया झोरे, अॅड.सचिन कोष्टी, अॅड.संजीव वानखेडे, अॅड.स्वाती कापडे, अॅड.एस.पी.अढाईंगे, अॅड.विजयालक्ष्मी यांनी काम पाहिले.
यांनी घेतले परीश्रम
सह दिवाणी न्या.एस.एन.फड, डी.एम.शिंदे, तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड.अशोक शिरसाठ, अॅड.एस.एम.घोलप, अॅड.ए.एस.गुप्ता, अॅड.मोघे, अॅड.जगदीश भालेराव, अॅड.राठोड, अॅड.जुमनानी, गटविकास अधिकारी व्ही.एन.भाटकर, विस्तार अधिकारी पाटणकर, दिवाणी न्यायालयाचे पी.जी.नगरकर यांनी सहकार्य केले. विधी सेवा समितीचे लिपिक पी.एम.काळे, लिपिक किशोर पिंगाणे यांनी परीश्रम घेतले.