भुसावळात लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनीही घेतले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

0

भुसावळ- जागतिक आपत्ती धोका निवारण दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत आपत्ती व्यवस्थापन या विषयावर जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम मंगळवारी तहसील कार्यालयाच्या आवारात झाला. उद्घाटन आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे, पंचायत समिती सभापती प्रीती मुरलीधर पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, नायब तहसीलदार संजय तायडे यांच्यासह नगरसेवक, अधिकारी व कर्मचार्‍यांनी आपत्ती व्यवस्थापन संबंधित सर्व यंत्रणा व त्यांच्याकडील सर्व शोध व साहित्यांची पाहणी केली

लोकप्रतिनिधी अधिकार्‍यांनी जाणली माहिती
उपविभागीय स्तरावर सुरू असलेला हा जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम जळगाव,भुसावळ, चाळीसगाव व अंमळनेर येथे 13 ऑक्टोबर ासून सुरू आहे. जळगाव येथील जैन ईरीगेशन, महानगरपालिका, वन्यजीव संस्था व अर्जुना बहुद्देशीय संस्थेने आपल्या साहित्यासंदर्भात माहिती दिली. सर्व लोकप्रतिनिधी व अधिकारी व मान्यवरांनी यावेळी आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घेतले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंग रावळ यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. भुसावळ येथील सेंट अलॉयसीस, डी.एस व भुसावळ हायस्कूल आदी शाळेतील विद्यार्थी, नागरीक नगरसेवक आदी उपस्थित होते.