भुसावळात वडार समाजाची घरपट्टी नावे लावण्याची मागणी

0

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाचे निवेदन

भुसावळ- शहरातील वडार समाजाच्या नागरीकांना म्हाडाकरीता घरे देण्यात आली होती परंतु त्यांना तेथून काढून यावल नाका रोडवरील येथील मारोतीनगर भागात जागा देण्यात आली आहे. यामुळे या नागरीकांनी या भागात स्वखर्चाने घराचे बांधकाम केले आहे मात्र सद्यस्थितीतही त्यांची ही घरे भुसावळ नगरपालिकेच्या घरपट्टीपासून वंचित ठेवण्यात आली आहे. यामुळे या नागाीकांच्या पुनर्वसनाकरिता भुसावळ नगरपालिकेने लवकरात लवकर गोरगरीब वडार समाजाच्या नागरीकांना घरपट्टी लागू करावी, अशी मागणी नगरपालिकेचे नगराध्यक्ष रमण भोळे व उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष मुन्ना सोनवणे व मारोतीनगर मधील वडार समाजाच्या रहिवाशांनी केली आहे. यावेळी सुभाष राखुंडे, मुकेश राखुंडे, संतोष गुंजाळ, रूपेश कुर्‍हाडे, सुनीता कुर्‍हाडे, गीता शिरसाठ, सुशील भारसखे, मिराबाई राखुंडे, चंदाबाई राखुंडे, शांताबाई गुंजाळ, अरुण राखुंडे, राधा पवार, शोभा राखुंडे, पारूबाई शिंदे, सुमन राखुंडे, सुनील जाधव, रेखा पिराजे कुर्‍हाडे आदींची उपस्थिती होती.