भुसावळ- शहरातील रेल्वे दगडी पुलाजवळ भारत नगरातील रहिवासी असलेल्या नारायण तुकाराम ठोसर (71) यांनी गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास कुठल्यातरी धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. डाऊन साईडवर किलोमीटर नंबर 443/09 जवळ त्यांचा मृतदेह आढळला. दरम्यान, लोहमार्ग पोलिसांनी ठोसर यांचा मृत्यू धावत्या गाडीखाली आल्याने कटल्याने झाल्याचे सांगत ही आत्महत्या आहे वा नाही याबाबत तपास सुरू असल्याचे सांगितले. ठोसर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परीवार आहे. लोहमार्ग पोलिसात ऑन ड्युटी डीवायएसस यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार नारायण देवकर करीत आहेत.