भुसावळात विकासकामांचे उद्घाटन : रस्त्यांच्या कामामुळे समाधान

युवा नेतृत्व गौरव आवटे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

भुसावळ : शहरातील ज्येष्ठ माजी नगरसेवक राजेंद्र दत्तु आवटे यांचे चिरंजीव तथा युवा नेतृत्व गौरव राजेंद्र आवटे यांचा गुरुवारी वाढदिवस असल्याने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तसेच सोशल मिडीयाद्वारे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मित्र मंडळींतर्फे केक कापून व फुलांचा पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रभागात विकासकामांचे उद्घाटन
गौरव आवटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या निधीतून गांधी नगर, बुद्ध विहार परीसरात सिमेंट काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले तसेच शिवदत्त नगर परीसरात पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाचे भूमिपूजन समाजसेवक प्रमोद सावकारे व जिल्हा परीषद सदस्य पल्लवी सावकारे, प्रभारी नगराध्यक्षा सोनी संतोष बारसे, नगरसेवक युवराज लोणारी, माजी नगरसेवक संतोष बारसे, शिवसेनेचे नगरसेवक मुकेश गुंजाळ, माजी नगरसेवक निकी बत्रा, समाजसेवक जय नागराणी, संजय आवटे, वेदजी ओझा, राजेशभाई चंदन, नरेंद्र यादव व स्थानिक नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान, ज्येष्ठ नागरीकांच्या सूचनेनंतर वाढदिवसाचे औचित्य साधून राधाकृष्ण मंदिरातील झाडांना पाण्याची सोय होण्यासाठी स्वखर्चाने बोअरवेल करून देण्यात आला. शंभुराजे ग्रुपतर्फे गौरव आवटे यांचे अभीष्टचिंतन करण्यात आले.