भुसावळात विक्री प्रतिनिधीचा मोबाईल लांबवला

0
भुसावळ- शहरातील अनिल नगर, रेल्वे फिल्टर हाऊसजवळील रहिवासी संजय किसन तिवारी (41) हे 23 ऑगस्ट रोजी रात्री 9.30 वाजता रेल्वे पुलाजवळून जात असताना अज्ञात दोघांनी त्यांच्या हातातील पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला. या प्रकरणी शहर पोलिसात तिवारी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार संजय पाटील करीत आहेत.