भुसावळ : आमदार संजय सावकारे यांच्या निधीतील रुग्ण वाहिकेचे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी पाच वाजता लोकार्पण करण्यात आले. प्रसंगी ट्रामा केअर सेंटर, ग्रामीण रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन केले.
भुसावळात अद्यावत रुग्ण वाहिकेचे लोकार्पण
मंगळवारी विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी येथील ट्रामा केअर सेंटरला भेट देत आमदार संजय सावकारे यांच्या निधीतील अद्यावत रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले. यावेळी ट्रामा केअर सेंटरच्या ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन केले तसेच ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्टची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे, माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, डॉ.राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर, डॉ. नि.तु. पाटील, जिल्हा शल्य चिकीत्सक एन.एस. चव्हाण, डॉ. मयुर चौधरी, डॉ. विक्रांत सोनार तसेच माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा नगरसेवक युवराज लोणारी, भाजप शहराध्यक्ष परिक्षित बर्हाटे, दिनेश राठी, गिरीष महाजन, राजू आवटे, संतोष बारसे, राजेद्र नाटकर, निक्की बतरा, अजय नागराणी, सतीश सपकाळे, अॅड. अभिजीत मेणे, अमोल महाजन, मंगेश पाटील आदी उपस्थित होते.