भुसावळ- शहरातील जाम मोहल्ला भागातील रहिवासी असलेल्या 27 वर्षीय विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली. सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. सलमा बी.अनिल पटेल (27, जाम मोहल्ला, भुसावळ) असे मृत विवाहितेचे नाव आहे. विवाहितेचा पती हा चारचाकी वाहनावर चालक असून तिला लहान मुलगा असल्याचे सांगण्यात आले. विवाहितेने गळफास घेतल्यानंतर शहरातील डॉ.राजेश मानवतकर यांच्या दवाखान्यात हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.