भुसावळ : विविध मागण्यांसाठी पालिका कर्मचार्यांच्या नगरपालिका वर्कर्स युनियनसह कृती समितीने मंगळवारी काळ्या फिती लावून कामकाज करीत पालिकेबाहेर निदर्शने केली. मागण्या मान्य न झाल्यास 20 एप्रिल रोजी मुंबईत मोर्चा व धरणे आंदोलन तर 1 मे पासून ध्वजवंदनानंतर सर्व अत्यावश्यक सेवेसह बेमुदत काम बंदचा इशारा कर्मचार्यांनी दिला आहे.
या मागण्यांसाठी आंदोलन
नगरपालिकांना मागणीपेक्षा कमी देण्यात आलेल्या सहाय्यक अनुदान त्वरीत वितरीत करण्यात यावे, सेवा ज्येष्ठतेनुसार कर्मचार्यांना पदोन्नती देण्यात आलेली नाही त्यांना रोस्ट बिंदू नामावली नियमानुसार देण्यात यावी कर्मचार्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम अदा करण्यात याव आदींसह राज्य स्तरावरील 26 मागण्या व स्थानिक 11 मागण्यांबाबत पालिका कर्मचार्यांच्या कृती समितीने आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनातील पहिल्या टप्प्यात मंगळवारी काळ्या फिती लावून निदर्शन आंदोलन केले.
यांचा आंदोलनात सहभाग
नगरपालिका वर्कर्स युनियने अध्यक्ष राजू खरारे आदींसह सर्व पदाधिकारी, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, अखिल भारतीय सफाई कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी संघटना, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.