नगराध्यक्ष रमण भोळेंवर शुभेच्छांचा वर्षाव ; विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप
भुसावळ- लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण देविदास भोळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील प्रभाग क्रमांक 20 मधील दीनदयाल उपाध्याय शाळा क्रमांक 35 मध्ये नवीन शाळा खोल्यांचे भूमिपूजन नगराध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक युवराज लोणारी, प्रमोद नेमाडे, अॅड.बोधराज चौधरी, किरण कोलते, उद्योजक मनोज बियाणी, सतीश सपकाळे, पुरूषोत्तम नारखेडे, किशोर पाटील, सोनल महाजन, सीमा चौधरी, देवा वाणी यांच्यासह आयोजक महेंद्रसिंग ठाकूर तसेच प्रभागातील सतीश खंडाळे, संजय ठाकूर, किरण मिस्त्री, हेमंत मिस्त्री, प्रदीप कोळी, उमेश ठाकूर, अर्जुन बाविस्कर, अक्षय बर्हाटे, विक्की ठाकूर, विकास राखुंडे आदींची उपस्थिती होती.