भुसावळ- भुसावळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक जळगाव जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, तालुकाप्रमुख समाधान महाजन यांच्या नेतृत्वात विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना भुसावळ दक्षिण विभागातर्फे बुधवार, 5 रोजी रेल कामगार सेना कार्यालय, स्टेशन रोड येथे सायंकाळी साडेपाच वाजता होत आहे. शिवसेना, युवासेना, रेल कामगार सेना, महिला आघाडी, शिक्षकसेना, वाहतूक सेना, ग्राहक संरक्षण कक्ष, अल्पसंख्याक आघाडी, दिव्यांग सेना, व्यापारी सेनेचे आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, उपशहर प्रमुख, उपशहर संघटक, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, बूथ प्रमुख, ज्येष्ठ शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन दक्षिण विभागाचे शहरप्रमुख बबलू बर्हाटे यांनी केले आहे.