भुसावळात संचारबंदीचे उल्लंघण करणार्‍यांसह नियम मोडणार्‍या व्यापार्‍यांवर कारवाई

भुसावळ : नव्या नियमावलीच्या अनुषंगाने भुसावळात दुपारी चार वाजेनंतर दुकाने सुरू ठेवणार्‍या व्यापार्‍यांसह सायंकाळी पाच वाजेनंतर विनाकारण फिरणार्‍यांवर पोलिसांकडून धडक कारवाई केली जात असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. राज्यात डेल्टा प्लस व कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यांचा तिसर्‍या लेव्हलमध्ये समावेश झाल्यानंतर नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

वेळ मर्यादेचे उल्लंघण करणार्‍यांवर कारवाई
नव्या नियमानुसार नॉन इसेन्शीयल दुकानदारांना सोमवार ते शुक्रवारी सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवता येतील तर शनिवार व रविवारी मात्र दुकाने पूर्णपणे बंद ठेवणे बंधनकारक आहे मात्र वेळ मर्यादेनंतरही शहरात दुकाने सुरू राहत असल्याने शहर हद्दीत दोन तर बाजारपेठ हद्दीत तीन पथकांतर्फे कारवाई केली जात आहे तसेच सायंकाळी पाच ते पहाटे पाच संचारबंदी असल्याने विनाकारण बाहेर पडणार्‍यांवर शहरातील सहा भागात नाकाबंदीद्वारे कारवाई केली जात असल्याचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले.