भुसावळात संविधान प्रत जाळल्याचा विविध संघटनांतर्फे निषेध

भारत मुक्ती मोर्चा, वकील संघ, राष्ट्रीय मजदूर सेना व भारीपने केला घटनेचा निषेध

भुसावळ- दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर काही देशद्रोही यांनी भारतीय संविधानाची प्रत जाळल्या प्रकरणी शहरातील भारत मुक्ती मोर्चा, वकील संघ, राष्ट्रीय मजदूर सेना व भारीपने या घटनेचा निषेध करीत पोलीस व प्रांताधिकारी प्रशासलना निवेदन देत दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत या अप्रिय घटनेचचा निषेध केला आहे. सोमवारी विविध संघटनांतर्फे या संदर्भात निवेदन देण्यात आले.

वकील संघाने दिले निवेदन
सोमवारी भुसावळ वकील संघातर्फे प्रांतांधिकारी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.अशोक शिरसाठ, अ‍ॅड.सुनील पगारे, अ‍ॅड.पी. ई. नेमाडे, अ‍ॅड.एम.एस.सपकाळे, अ‍ॅड.एन.डी.चौधरी, अ‍ॅड.तुषार पाटील, अ‍ॅड.मतीन अहमद, अ‍ॅड.मनीष सेवलानी, अ‍ॅड.चरणजित सिंग, अ‍ॅड.फिरोज शेख, अ‍ॅड.राजेंद्र रॉय, अ‍ॅड.विजय तायडे, अ‍ॅड.विलास हिरे, अ‍ॅड.प्रकाश फेंगडे, अ‍ॅड.अनिल सावळे, अ‍ॅड.अनिल कुटे, अ‍ॅड.अनिल कोळी, अ‍ॅड.अल्बर्ट डिसुझा, अ‍ॅड.राजेश कोळी, अ‍ॅड.प्रफुल्ल पाटील आदी वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारत मुक्ती मोर्चातर्फे पोलिस प्रशासनाला दिवेदन
दिल्ली येथे जंतर मंतरवर संविधान जाळल्याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करून अश्या देशद्रोहींविरूध्द गुन्हे दाखल केले जावे, अशी मागणी भारती मुक्ती मोर्चातर्फे जितेद्र शंकर नामदास यांनी शहर पोलिसांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. संविधानाची प्रत जाळून त्यांनी गंभीर गुन्हा केला असून भारतीय संविधानच त्यांनी नाकारले आहे त्यामुळे त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना कडक शासन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. दोषींवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी जितेंद्र नामदास, हारून मन्सुरी, विजय सावळे, आर.ई. जमदाणे, प्रेमा पाने, रजनी परदेशी, ज्ञानदेव भालेराव, कुंदन तायडे, संदीप भालेराव आदींनी केली.

फास्ट ट्रक न्यायालयात खटला चालवावा
जंतर मंतर येथे संविधानाची प्रत जाळल्याप्रकरणी संबंधित संशयीतांविरूध्द गुन्हे दाखल करून त्यांचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा, अशी मागणी राजू सूर्यवंशी यांनी केली आहे. प्रांताधिकारी यांना सोमवारी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात ही मागणी केली आहे. हा देश संविधानावर सुरू असून काही जातीयवादी लोकांच्या भारतीय राज्य घटना विरोधी कारवाया वाढल्या आहे. अश्या पडद्यामागील लोकांची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मान्य न झाल्यास 20 ऑगस्ट रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मानवता विरोधी ग्रंथ मनुस्मृतीचे दहन करण्यात येईल, असा इशारा राजू सूर्यवंशी, राजू डोंगरदिवे, लक्ष्मण जाधव, शरद सोनवणे, प्रकाश निकम, मुन्ना सोनवणे, सुदाम सोनवणे, गौतम शेजवळ, बाळू सोनवणे, मनोहर सुरडकर, सुनील ढिवरे, भगवान निरभवणे यांनी दिला आहे.

सोमवारी पीआरपीतर्फे रेल रोको
दिल्ली येथे जंतर मंतरवर संविधानाची प्रत जाळल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करून त्यांना देशद्रोही जाहीर करावे, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी 20 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील 10 रेल्वे स्थानकांवर विविध 10 संघटनातर्फे रेल रोको आंदोलन केले जाणार आहे, तसेच 26 नोव्हेबर संविधान दिनी भारत बंद करून दिल्ली येथे संसदेवर दुपारी दोन वाजता संविधान बचाव, ईव्हीएम हटाव, देश बजाव, संविधान जाळणार्‍यांना कठेोर शिक्षा व्हावी यासाठी जनआंदोलन केले जाणार असल्याचे पीआरपी प्रदेश महामंत्री जगन सोनवणे, राष्ट्रीय मोलकरीन सेनेच्या प्रदेश अध्यक्षा तथा माजी पंचायत समिती सदस्या पुष्पा सोनवणे, संगीता ब्राम्हणे, चंद्रकला कापडणे यांनी दिली.

मूलनिवासी संघातर्फे निवेदन
दिल्ली येथील जंतर मंतर येथे संविधानाची प्रत जाळणार्‍यांविरूध्द कडक कारवाई करून त्यांच्या विरूध्द देशद्रोहचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मूलनिवासी संघातर्फे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. संविधान जाळणे कायद्याने अपराध आहे, त्यामुळे सरकारने याची दखल घेत संबंधितांवर कडक कारवाई करावी.तेथील व्हीडीओ श्रीनिवास पांडे यांनी अपलोड केला असून पांडे उत्तर प्रदेशातील आहे. त्यांमुळे त्यांच्यावर कारवाई गरजेचे आहे, असे मूलनिवासी संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेद्र हिवाळे, सचिव राकेश उज्जैनवाल, आर.बी. चारण, एस.झेड.गवळी, सुनील घेंगट, आंनंद तपासे , अनिल सोनवणे यांनी मागणी केली आहे.

राष्ट्रीय दलित पॅथरतर्फे निषेध
दिल्लीतील घटनेत संविधानाची प्रत जाळणार्‍या देशद्रोहाचा येथे राष्ट्रीय दलित पॅथरतर्फे निषेध करण्यात आला आहे. संबंधितांवर गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकावे, या देशात राहात असतांना देशाचे संविधान जाळतात ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यासाठी खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवून लवकरात लवकर संबंधितांना शिक्षा झाली पाहीजे, अशी मागणी राष्ट्रीय दलित पॅथरतर्फे प्रदेश सरचिटणीस सिध्दार्थ सोनवणे, अनिल इंगळे, महेद्र सपकाळे, प्रदीप सपकाळे, दिलीप सूर्यवंशी, समाधान सोनवणे, गोविदा साळुंखे यांनी प्रांताधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

भारिप बहुजन महासंघाचे निवेदन
भुसावळ- भारिप बहुजन महासंघाने शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना निवेदन देत संविधान जाळणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली. निवेदनावर जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष विजय पवार, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश इखारे, तालुकाध्यक्ष अ‍ॅड.मनोहर सपकाळे, जिल्हा संघटक सचिव प्रवीण आखाडे, जिल्हा सचिव संजय सुरडकर, युवा तालुकाध्यक्ष प्रमोद बाविस्कर, शहराध्यक्ष गणेश इंगळे, युवा शहराध्यक्ष विद्यासागर खरात आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.