भुसावळात सकल मराठा समाजातील गुणवंतांचा होणार 29 रोजी गौरव

0

भुसावळ- राजर्षी शाहु महाराज बहुउद्देशीय प्रतिष्ठानतर्फे तालुक्यातील सकल मराठा समाजातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा 29 जुलै रोजी लोणारी मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजता आयोजित केला आाहे. समाजातील पहिली ते आठवीपर्यत सर्व तसेच नववी ते 12 वी पर्यंतच्या वर्गातील 70 टक्यांपेक्षा अधीक तर डिप्लोमा, पदवी, पदवीत्तर गुणवंतांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविले जाईल. सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणर्‍यांचाही गौरव केला जाणार आहे. गुणवंतांनी आपल्या गुणपत्रिकेची झेरॉक्स छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील स्वामीराज डिजिटल, आनंद डिजिटल फोटो स्टुडिओ येथे जमा कराव्यात. तसेच प्रतिष्ठानचे संस्थापक टी एस बावस्कर, अध्यक्ष अशोक ई चौधरी, उपाध्यक्ष प्रा पंकज पाटील, सचीव के.यु. पाटील (शिक्षक) यांच्याशी व राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठानच्या पदाधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.