भुसावळात सट्टा खेळणार्‍यांना शहर पोलिसांकडून अटक

0

भुसावळ- मंगळवारी सायंकाळी 7.15 वाजता कंडारी येथील प्लॉट भागात सट्टा खेळताना गोपाळ हिरालाल गुप्ता यांच्याकडून 950 रुपयेे रोख आणि सट्टा जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले तसेच लोको गेटसमोरून मुकेश भूईंगड यास ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून एक हजार 140 रुपये जप्त करण्यात आले. ही कारवाई डीवायएसपी गजानन राठोड, शहरचे प्रभारी पोलिस निरीक्षक देवीदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार साहील तडवी, शंकर पाटील, विजय पाटील, संजय बडगुजर, सोपान पाटील, विशाल मोहे आदींच्या पथकाने केली. आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर रात्री त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.