भुसावळात सट्ट्यावर धाड : तिघांना अटक

0

नूतन पोलीस उपअधीक्षकांची कामगिरी : 20 हजारांची रोकड जप्त

भुसावळ- शहरातील पंचशील नगर भागात कल्याण सट्टा सुरू असल्याची गुप्त माहिती पोलीस उपअधीक्षक गजानन राठोड यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईच्या सूचना केल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळत 19 हजार 770 रुपयांची रोकड जप्त केली तर सट्टा चालक मात्र पसार होण्यात यशस्वी झाला. रवींद्र प्रल्हाद पाचपांडे, सोपान उखा बर्‍हाटे, मारोती वेडू भालेराव अशी अटकेतील आरोपींची नावे असून सट्टा चालक दादाराव साळवे (पंचशील नगर, भुसावळ) पसार झाला आहे. मंगळवारी दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास ही कारवाई सहाय्यक फौजदार दिलीप कोळी, हवालदार प्रदीप पाटील, नंदकिशोर सोनवणे, छोटू वैद्य आदींच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी छोटू वैद्य यांच्या फिर्यादीनुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.