भुसावळ- शहरातील आरपीडी रोडवरील मच्छी मार्केट जवळ सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाल्याने जळगाव येथील एलसीबी आणि शहर पोलिसांनी मिळून छापा टाकद तीन हजार 650 रूपये रोख आणि सट्टयाचे साहित्य जप्त केले. ही कारवाई बुधवारी सायंकाळी करण्यात आली. हवालदार रवींद्र पाटील, दीपक पाटील, शहर पोलिस ठाण्याचे संजय पाटील यांनी राजू सूरवाडे यास अटक केली तर शेख इरफान हा संशयीत पसार झाला. दोघांविरुद्ध रवींद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार मोहंमद अली सय्यद करीत आहेत.