बाजारपेठ पोलिसांची कामगिरी ; शस्त्र पुरवठादारांचा शोध घेण्याचे आवाहन
भुसावळ- बाजारपेठ पोलिसांनी बुधवारी एकाच दिवशी तलवार बाळगणार्या दोघांच्या मुसक्या आवळल्यानंतर गुरुवारी. सकाळी 11.30 वाजता देखील बसस्थानक परीसरात तलवारीच्या धाकावर दहशत निर्माण करणार्या एकास अटक केली. शेख इरफान ऊर्फ (ईपु) शेख रहहिम (22, रा.आगाखान वाडा, शिवाजी नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
दोन दिवसात तीन तलवारी जप्त
अवैधशस्त्र जप्त पथकाने बुधवारी शहरातील मच्छी मार्केट परीसरातील सात नंबर पोलीस चौकीजवळ तलवारीच्या धाकावर दहशत निर्माण करणार्या शेख मोहसीन उर्फ (बिलू) शेख हासीफ (25, रा.मटण मार्केटजवळ नसरवांजी फाईल, भुसावळ) यास तसेच बुधवारी गजनी रफिक खान (20, जाम मोहल्ला, भुसावळ) यासही अटक केली होती. दोघा आरोपींकडून तलवार जप्त केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता तर गुरुवारी सकाळी पुन्हा एक संशयीत बसस्थानक भागात तलवार बाळगून असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
यांनी केली कारवाई
सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अवैधशस्त्र जप्त पथकातील उपनिरीक्षक युवराज अहिरे, सुनील सैंदाणे, सुनील थोरात, कृष्णा देशमुख, निलेश बाविस्कर, दीपक जाधव, उमाकांत पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, आरोपीच्या ताब्यान एक हजार 500 रुपये किंमतीची दोन फूट आठ इंच लांबीची तलवार जप्त करण्यात आली. तपास पोलीस नाईक साहील तडवी करीत आहेत.