भुसावळ : शहरातील खडका रोड भागातील 32 खोली रस्ता वळणावरील आशादिप बिल्डींग समोर वास्तव्यास असलेल्या व्यक्तीचे 23 रोजी सारीच्या आजाराने निधन झाले मात्र रात्रीच त्यांचा मृतदेह रूग्णालयातून आणल्यानंतर संबंधितानी घराबाहेर ठेवल्याने परीसरात खळबळ उडाली. या परीसरात पालिका प्रशासनाने फवारणी करणे गरजेचे असतानाही दुर्लक्ष करण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात आला तर संसर्गजन्य आजारामुळे मृत्यू झाल्याने अंत्यसंस्कार कसे करावे ? असा प्रश्न होता. सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील, साजीद शेख यांनी नगरपालिका रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉॅ.किर्ती फलटणकर यांच्याशी संपर्क साधून कर्मचारी व शववाहिनीची मागणी केली मात्र पीपीई किटची मागणी त्यांनी मान्य केली व दोन किट उपलब्ध करून दिल्यानंतर परीसराील मोजक्या हिंदु-मुस्लीम बांधवांनी शेवटी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.