भुसावळात सासरी आलेल्या जावयाला पोलिसांकडून अटक

0

पत्नीचा छळ भोवला ; न्यायालयाने सुनावली पोलिस कोठडी

भुसावळ- भुसावळ येथील माहेर व नांदेड येथील सासर असलेल्या विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या सहा आरोपींविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसात 26 सप्टेंबर 2018 गुन्हा दाखल होता. हिराबाई ज्वालासिंग चितोडीया (केशर नगर, भुसावळ) या विवाहितेने या प्रकरणी सासरच्यांविरुद्ध छळ केल्यास मारहाण केल्याची तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्यातील संशयीत आरोपी तथा विवाहितेचा पती रामूसिंग मोहनसिंग चितोडीया (33, रा.नांदेड) हा 10 रोजी भुसावळातील केशर नगरात विवाहितेच्या घरी आल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील जोशी, विकास सातदिवे आदींनी आरोपी रामूसिंग यास अटक केली. आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर केले सता त्यास एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.