भुसावळ। शहरात सिंधी कॉलनी परिसरात असलेल्या झुलेलाल मंदिरात 27 मे पासून आयोजित संस्कार शिबीराचे 2 जून रोजी समारोप करण्यात आला. भारतीय सिंधू सभातर्फे सिंधी संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले. त्यात 40 बालकांनी सहभाग घेतला. भारतीय सिंधी सभेचे प्रदेशाध्यक्ष दादा प्रितमदास रावलानी यांनी बालकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यांनी घेतले परिश्रम
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कार्यालय मंत्री रितु रायशिगानी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिव संदिप कुकरेजा व युवा प्रदेश सदस्य दिनेश दोधानी यांनी परिश्रम घेतले.