भुसावळात सेवानिवृत्त कर्मचार्‍यास लूटले : जळगावच्या रीक्षा चालकाविरुद्ध गुन्हा

0

भुसावळ- ऑर्डनन्स फॅक्टरीतील सेवानिवृत्त कर्मचार्‍यास रीक्षात मारहाण करीत त्याच्याकडील दहा हजारांच्या रोकडसह पाच हजारांचा मोबाईल लांबवण्याची घटना 12 रोजी जळगाव रोडवरील कोणार्क हॉस्पीटलजवळ घडली. या प्रकरणी रमेश शंकर दांडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी तथा रीक्षा चालक सुरेश पोपट सोनवणे (जळगाव) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता आरोपीने दांडेकर यांना अडवत लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जबरदस्ती करून मोबाईल काढला व पोलिसात तक्रार केल्यास सोडणार नाही, अशी धमकी दिली. तक्रारदाराने उशिराने तक्रार दिल्याने शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय संजय कंखरे करीत आहेत. दरम्यान, अशाच पद्धत्तीने आरोपीने जळगावातदेखील गुन्हा केल्याची माहिती आहे.