भुसावळ । स्वच्छतेसंदर्भात जनजागृती होण्यासाठी पालिकेतर्फे ‘एक पाऊल स्वच्छतेकडे’ या विषयावर शनिवारी सकाळी सात वाजता यावल रोडवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यापासून प्रभातफेरी काढण्यात आली.
स्वच्छता फेरीतील घोषवाक्यांनी शहरवासियांचे लक्ष वेधले. स्वच्छ सर्वेक्षण 2017 मध्ये सहभागी व्हा, घरातील कचरा घंटागाडीत टाका, ओला व सुका कचर्याचे वर्गीकरण करा आदी घोषवाक्याच्या फलकांनी लक्ष वेधले. नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, आरोग्य सभापती दीपाली बर्हाटे, स्वच्छता ब्रँड अॅम्बेसेडर रणजीत राजपूत, प्राचार्य शुक्ला यांच्यासह विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले.