भुसावळात स्व. देविदास गोविंद फालक स्मृती खान्देश नाट्य महोत्सव

0

रसिकांसाठी 5 व 6 सप्टेंबरला दोन महत्वाच्या कार्यक्रमांचे आयोजन

भुसावळ- उत्कर्ष कलाविष्कार आणि पु. ओ. नाहाटा महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्व.देविदास गोविंद फालक स्मृती खान्देश नाट्यमहोत्सवांतर्गत रसिकांसाठी 5 व 6 सप्टेंबर प्रदीर्घ मुलाखतीसह अभ्यास सत्र व ‘लोक परंपरेची नांदी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 5 सप्टेंबर रोजी आधुनिक मराठी रंगभूमीवरील महत्वाचे नाटककार शफाअत खान यांची प्रदीर्घ मुलाखत आणि नाटक शिकू पाहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास सत्राचेही आयोजन करण्यात आले आहे. तसेच त्यांची मुलाखत अभ्यासू आणि प्रयोगशील अभिनेते अक्षय शिंपी घेणार आहेत तर 6 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वावजता ‘लोक परंपरेची नांदी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

शफाअत खान आपलं मौन सोडणार
प्रदीर्घ काळानंतर शफाअत खान प्रथमच खान्देशात येत आहेत. खान्देशच्या नाट्यकर्मीं समोर ते आपलं मार्गदर्शन करणार आहेत आणि त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शफाअत खान मधल्या एका मोठ्या कालावधीत मौन होते. एवढ्या प्रदीर्घ कालावधीनंतर शफाअत खान आपलं मौन सोडणार आहे. या मुलाखतीतून खान्देशातील रसिकांशी आणि रंगकर्मींशी संवाद साधणार आहेत. सत्रासाठी नावनोंदणी आवश्यक असून 50 रुपये फी ठेवलेली आहे. या सत्रात मोजक्या 50 व्यक्तींना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

6 रोजी ‘लोक परंपरेची नांदी’
6 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वावजता ‘लोक परंपरेची नांदी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील लोकपरंपरेचे दर्शन यातून होणार आहे. अभंग, गवळण, वगनाट्य, लावणी, बतावणी, वाघ्यामुरळी, गोंधळ जागरण, भारुड, पोवाडा अशा मराठमोळ्या परंपरेचं सादरीकरण होणार आहे. यात एकूण 20 कलावंत आणि वादक व तंत्रज्ञ मिळून 30 रंगकर्मी असणार आहेत. याची निर्मिती नाट्यशास्त्र विभाग, नाहाटा महाविद्यालयाने केली आहे. दोन्ही दिवसांचे कार्यक्रम निःशुल्क असून जास्तीत जास्त रसिकांनी याचा आनंद घ्यावा असे आवाहन उत्कर्ष कलाविष्कार आणि पु.ओ.नाहाटा महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.