भुसावळात स्व.बी.सी.बियाणी यांना स्मृतीदिनी आदरांजली

0

भुसावळ- बियाणी शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व.बी.सी.बियाणी (मामाजी) यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त बियाणी मिलिटरी स्कूलमधील त्यांच्या समाधीस्थळी बियाणी परीवार व संस्थांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी आदरांजली अर्पण केली.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी कांताबाई बियाणी, संस्थाध्यक्ष मनोज बियाणी, संस्था संचालक विनोद बियाणी, संस्था सचिव संगीता बियाणी, संचालिका स्मिता बियाणी, आमदार संजय सावकारे, रजनी सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्यधिकारी रोहिदास दोरकुळकर, प्रमोद सावकारे, वासुदेव बोंडे, वसंत पाटील, नगरसेवक किरण कोलते, पाणीपुरवठा सभापती पिंटु ठाकूर, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, किशोर पाटील, राजू पारीख, किरण पारीख, प्रवीण भराडिया, सरोज भराडिया, मनोज माहेश्वरी, दीपक धांडे, संजय आवटे, फिरोज पठाण, रामचंद्र तायडे, गोपाळ ठाकूर, देवा वाणी, अ‍ॅड.निर्मल दायमा, गोपाळ तिवारी, मुख्याध्यापिका सोफिया फ्रान्सीस, श्याम गोविंदा आदी उपस्थित होते. यावेळी मिलिटरी स्कुलचे प्राचार्य डी.एम. पाटील यांनी मामाजींच्या आठवणींना उजाळा दिला.