भुसावळात हद्दपारीचे उल्लंघण : एकास अटक

0

भुसावळ : हद्दपारीचे उल्लंघण करून शहरात आलेल्या अजयसिंग रायसिंग पंडित (रा.वाल्मीक नगर, भुसावळ) यास बाजारपेठ पोलिसांनी अटक करीत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. वरणगाव रस्त्यावर पंडित हे फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपीस अटक करण्यात आली मात्र तत्पूर्वी आरोपीने पोलिसांशी हुज्जत घातल्याने त्याच्याविरुद्ध सरकारी
कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुरूवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. रमण सुरळकर यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहा.फौजदार इरफान काझी पुढील तपास करीत आहेत.