भुसावळ- गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे हद्दपार केल्यानंतर शहरात वावर असणार्या हेमंत जगदीश पैठणकर यास बाजारपेठ पोलिसांनी सोमवारी अटक केली होती. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी घोडेपीर बाबा दर्ग्याकडे सोमवारी सायंकाळी फिरत असताना डीबी पथकातील सहायक फौजदार अंबादास पाथरवट, नीलेश बाविस्कर, दीपक जाधव, राहुल चौधरी, प्रशांत चव्हाण, सचिन चौधरी, विनोद वितकर, नरेंद्र चौधरी, उमाकांत पाटील यांनी आरोपीस अटक करीत गुन्हा दाखल केला.