भुसावळ- शहरात घरफोड्यांचे सत्र थांबायला तयार नाही. हुडको कॉलनीतील रहिवासी व माजी सैनिक प्रकाश तायडे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील एलसीडीटीव्ही, मंगळसूत्र, आठ हजारांच्या रोकडसह चांदीच्या वस्तू मिळून सुमारे लाखांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. प्रकाश तायडे बाहेरगावी गेल्याची चोरट्यांनी संधी साधली. तायडे यांचे व्याही यांनी मंगळवारी सकाळी घराचा दरवाजा उघडा पाहून डोकावले असता चोरी झाल्याचे उघडकीस आले. शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक वैभव पेठकर व पोलिस कर्मचार्यांनी घराची पाहणी केली. प्रकाश तायडे हे माजी सैनिक असून चोरट्यांनी एलसीडी टिव्ही, मंगळसूत्र, चांदीच्या लहान मुलांच्या वस्तू आणि आठ हजार रुपये रोख असा सुमारे एक लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला.